आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहेल्मेट सक्तीच्या दुसऱ्या दिवशी विनाहेल्मेट चालकांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले. शहरातील ८ ठिकाणी लावलेल्या चेकिंग पाॅइंटवर झालेल्या कारवाई ५४४ विनाहेल्मेट चालक आढळून आले. या चालकांकडून २ लाख २५ हजारांची दंड वसूल करण्यात आला.
शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालकांच्या अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याची दखल घेत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरात १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती कारवाई सुरू केली. पहिल्या दविशी ५५४ विनाहेल्मेट चालकांवर कारवाई करण्यात आली. २ लाख ७७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी वाहतूक विभागाच्या युनिट १ ते ४ मध्ये कारवाई करण्यात आली. तारवाला नगर सिग्नल, राज स्विट्स काॅर्नर, सिटी सेंटर माॅल, बाफणा ज्वेलर्स, खुटवड नगर, माऊली लाॅन्स, विहितगाव, भैरवनाथ मंदिर लॅमरोड, या ८ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहतूक विभागाचे ८ अधिकारी आणि २४ कर्मचारी सहभागी झाले होते. उपआयुक्त पौर्णिमा चौघुले, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.