आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Action Against 567 Robbers In 10 Days; Investigating Criminals On 204 Records, Police In The City Stepped Up Night Patrols |marathi News

कोम्बिंग ऑपरेशन:10 दिवसांमध्ये 567 टवाळखोरांवर कारवाई ; 204 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, शहरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात नऊ खुनांच्या आणि रस्त्यावरील हाणामारीच्या घटनांमुळे पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडवर आली असून २ ते ११ जून या १० दिवसांत राबविण्यात आलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रात्री विनाकारण फिरणाऱ्या ५७२ टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली. या १० दिवसांत ११ जूनपर्यंत तब्बल १६४८ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये तडीपार, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही समावेश आहे. पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ १ मधील पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबईनाका, गंगापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिस पथकाने पायी गस्त केली. विशेष मोहिमेंतर्गत टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. गुन्हेगार चेकिंग, हत्यार प्रतिबंधक कारवाई, पाहिजे असलेले आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी, तडीपार चेकिंग करण्यात येत आहे. कोम्बिंग ऑपरेशन मोहिमेंतर्गत पायी पेट्रोलिंग पथक, कोम्बिंग ऑपरेशन पथक, टवाळखोर पथक, गुन्हेगार चेकिंग पथक, अवैध मद्य विक्री कारवाई पथक, अवैध जुगार प्रतिबंध पथक, हत्यार प्रतिबंध पथक, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी पथक अशी स्वतंत्र पथकांकडून शहरात ही कारवाई सुरू आहे.

अशी झाली कारवाई
अवैध मद्य विक्री- १२, अवैध जुगार-४ अवैध हत्यार प्रतिबंध कारवाई- १०, पाहिजे असलेले आरोपी- ८३, रेकॉर्डवरील आरोपी- २०४, सर्व्हेलन्स तपासणी- १०६ हिस्ट्रीसीटर- १५३ तडीपार आरोपी- २२६ टवाळखोर- ५७२ वेळेत अस्थापना बंद न करणे- ६८ संशयास्पद फिरणारे- २ तडीपार असताना शहरात वावर- ३, वॉरंट समन्स- ३९ आरोपींची तपासणी- १० पंचवटी- ३२१, आडगाव- १४०, म्हसरूळ- १३३, भद्रकाली- ३२०, सरकारवाडा- १९६, गंगापूर- १९६, मुंबईनाका- १७८ अशा १४८४ कारवाया पोलिस ठाणेनिहाय करण्यात आल्या.

खून, हाणामारीच्या घटना सुरूच
पोलिस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना शहरात खून व हाणामारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनही चक्रावले आहे. सिडकोतील खाद्य प्रदार्थ विक्रेता कैलास साबळे याचा रविवारी संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेने शहर पुन्हा रविवारी हादरले. तर सातपूर येथील विठ्ठल नर्सरीची टवाळखोरांनी तोडफोड केली. त्यामुळे खून, हाणामारी, गुंडगिरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...