आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:देवळालीत प्लास्टिक वापरणाऱ्या पाच जणांवर कारवाई

देवळाली कॅम्पएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कॅन्टाेन्मेंट बाेर्डाच्या आराेग्य विभागाकडून पाच जणांवर प्लास्टिक बंदीची कारवाई करण्यात आली. प्लास्टिकचा सर्रास वापर करणाऱ्या दुकानदारांवर मंगळवारी (दि. १) आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये कारवाई संदर्भात तपासणी केली असता पाच जणांकडे प्लास्टिक आढळले असून त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करत साडेबारा हजार रुपये दंड आकारण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक चव्हाण, अतुल मुंडे, शाजेब सय्यद यांनी ही कारवाई केली. कॅन्टाेमेंट बाेर्डाच्या आराेग्य विभागाकडून यापुढेही प्लस्टिकबंदीची कारवाई राबविण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...