आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:विनाहेल्मेट 600 हून अधिक वाहनधारकांवर कारवाई

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनाहेल्मेट धारकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या तीन दिवसांत शहरात ४०० हून अधिक वाहनधारकांना कारवाई करत दंडाचा दणका देण्यात आला आहे. शहरात अचानक तपासणी मोहीम राबवत पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबर अपघातांचीही संख्या वाढली आहे. या अपघातात हेल्मेट नसल्यामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्यामुळे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरात हेल्मेट सक्ती केली आहे. विविध माध्यमातून व उपक्रमांद्वारे पोलिस प्रशासनाकडून देखील जनजागृती करण्यात आली. मात्र त्यानंतरही अनेक वाहनधारकांकडून हेल्मेट परिधान करण्याकडे टाळाटाळ केली जात होती. याच पार्श्वभुमीवर २ एप्रिलपासून शहरात पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. द्वारका, मुंबईनाका, गंगापूररोड, इंदिरानगर, सिडकोसह विविध भागात अचानक तपासणी मोहीम राबवत विनाहेल्मेट धारकांवर कारवाई केली जात आहे. गेल्या तीन दिवसांत ६०० हून अधिक वाहनधारकांना कारवाईचा दणका दिला आहे. कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे व हेल्मेटच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पैसे नसल्याने वाहन जप्त
ज्या वाहनधारकांकडे दंड भरण्यास पैसे नाही अशा वाहनधारकांचे वाहने थेट जमा करत शहर वाहतूक शाखेत जमा केले जात आहे यामुळे मात्र नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलिसांच्या या भूमिकेबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे

बातम्या आणखी आहेत...