आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Action By Nashik Municipal Corporation 341 Manipulation By Contractor In Maintenance And Repair Of Parks; Municipal Notices To 45 Contractors

नाशिक मनपाकडून कारवाई:341 उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीमध्ये ठेकेदाराकडून हातचलाखी; 45 ठेकेदारांना पालिकेची नोटीस

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुलशनाबाद अशी ओळख असलेल्या नाशिक शहरांत गेल्या काही वर्षात 'दिसली मोकळी जागा की कर उद्यान' या धोरणामुळे अस्तित्वात आलेल्या सुमारे 524 उद्यानाची देखभाल दुरुस्ती करणे दिवसागणिक महापालिकेसाठी अवघड ठरले आहे. त्यामुळे यापैकी अर्धा एकरपेक्षा मोठ्या असलेल्या जवळपास 341 उद्यानाची देखभाल ठेकेदाराकडे दिल्यानंतर त्यांच्याकडून स्वच्छतेत हातचलाखी होत असल्याचे बघून उद्यान विभागाचे नवीन उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी अचानक तपासणी सुरू केली असून त्यात तब्बल पंचेचाळीस उद्यानांच्या देखभालीत त्रुटी आढळल्यामुळे त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात अनेकदा मागणी करूनही उद्यान विभागाकडून ठेकेदारांची चौकशी होत नसल्यामुळे शहरातील प्रमुख उद्यानाची दुरावस्था झाली होती. या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

नाशिक शहरामध्ये 524 लहान-मोठी उद्याने महापालिकेच्या अडचणीत बांधण्यात आली. मात्र या उद्यानाची देखभाल दुरुस्ती कालांतराने पालिकेसाठी पांढरा हत्ती पोसण्यागत ठरली. उद्यानांच्या माध्यमांमधून महापालिकेला एक रुपयाही उत्पन्न मिळत नसल्यामुळे खर्चाचे गणित बिघडत गेले. ही बाब लक्षात घेत मनसेची सत्ता असताना तत्कालीन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी खासगीकरणातून उद्यानांची देखभाल करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला जास्तीत जास्त लहान उद्यानांसाठी दहा हजार रुपये तर मोठ्या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वीस हजार रुपये इतका प्रतिमहा खर्चाचा हिशोब करून निविदा तयार केली गेली. उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीमध्ये कुचराई केल्यास स्थानिक नागरिकांना एनएमसी इ कनेक्ट या अँपवर तक्रारी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. मात्र कालांतराने या सर्वच प्रक्रियेकडे उद्यान विभागाने सोयीस्कर डोळे मिटण्याची भूमिका घेतली. मध्यंतरी, उद्यानांच्या देखभाल-दुरूस्तीची शहानिशा न करताच देयके अदा केली जात असल्याचा आरोप सभागृहनेते कमलेश बोडके यांनी केला असून उद्यान देखभालीच्या ठेक्याची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदारांना देयके अदा केली जाऊ नयेत, अशी सूचना देखील बोडके यांनी केली होती.

मात्र पुढे लोकप्रतिनिधींची पालिकेतील राजवट संपुष्टात आल्यामुळे व्यवस्थितपणे चौकशी होऊ शकली नाही. ही बाब लक्षात घेता आता, नवीन उप आयुक्त मुंडे यांनी देखभाल दुरुस्तीसाठी दिलेल्या 341 उद्यानांची नेमकी स्थिती काय याचा अहवाल उद्यान निरीक्षकांकडून मागवला आहे. त्यासाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिले असून या स्थळ पाहणीमध्ये ज्या ज्या बाबीबाबत त्रुटी आढळतील त्या अनुषंगाने नोटीस करून ठेकेदारांना बजावली जाणार आहे. त्यानंतर ठेकेदारांकडून या नोटिशीच्या अनुषंगाने खुलासा मागवला जाणार असून समाधानकारक खुलासा न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...