आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस:कोम्बिंग ऑपरेशनमध्ये कारवाई; रात्री 12 नंतर विनाकारण फिराल तर रवानगी पोलिस ठाण्यात

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये टवाळखोरांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच रात्री १२ नंतर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यांच्या आई-वडिलांना आता पोलिस ठाण्यात पाचारण करत त्यांच्याकडून कारण जाणून घेण्यात येईल. सोमवारी पहाटेपर्यंतच्या कारवाईत १६१ जणांवर कारवाई करण्यात आली. यात ४९ टवाळखोर आहेत. कारवाईत अल्पवयीन मुलांकडे प्राणघातक हत्यारे मिळून आल्याने या संशयितांचे व त्यांच्या कुटुंबियांचे पोलिसांकडून समुपदेशन केले जात आहे.

..अशी झाली कारवाई
अवैध दारू विक्री - १, अवैध जुगार - १, अवैध हत्यार प्रतिबंधक कारवाई - १, पाहिजे असलेले आरोपी तपासणी - ११, रेकॉर्डवरील आरोपी तपासणी - २२, सर्व्हेलन्स आरोपी तपासणी - १६, हिस्ट्रीशीटर तपासणी - २०, तडीपार तपासणी - ३१, टवाळखोर कारवाई - ४९. आदी कारवाईसह १६२ कारवाया करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...