आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणाची भूमिका:नाशिक जिल्ह्यात वीज चोरी प्रकरणात कारवाई; 261 विजचोरावर धडक कारवाई

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीजचोरीचे प्रमाण वाढत असल्याने महावितरण कंपनीने कडक पावले उचलत धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. नुकतीच नाशिक मंडळात 2 हजार 44 मीटर तपासणी केली असता, त्यामध्ये नाशिक शहर 1 व 2, नाशिक ग्रामीण आणि चांदवड मंडळातील 261 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

वीजचोरी, अनधिकृत वापर याविरोधात महावितरणने कारवाई सत्र सुरु केले आहे. नाशिक मंडळात पथकाने वीज चोरी व गैरवापर करणाऱ्याविरुद्ध आकस्मिक कारवाई केली. यामध्ये 2 हजार 44 विद्युत ग्राहकांची मीटर तपासणी करण्यात येऊन त्यामध्ये नाशिक शहर 1 व 2, नाशिक ग्रामीण आणि चांदवड या चारही विभागामध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 नुसार 236 जणांवर तर कलम 126 नुसार 25 ग्राहकांवर अशा एकूण 261 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण सातत्याने प्रयत्नशील असून नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंते धनंजय आहेर, माणिकलाल तपासे, राजाराम डोंगरे, रवींद्र आव्हाड यांचेसह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.

अशी झाली कारवाई

वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणाऱ्यांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 नुसार कारवाई करण्यात आली यामध्ये नाशिक शहर 1 मध्ये 06, नाशिक शहर 2 मध्ये 62, नाशिक ग्रामीणमध्ये 98, चांदवडमध्ये 70 जणांवर कारवाई करण्यात आली.

तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुसऱ्या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्याविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 126 नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये नाशिक शहर 1 मध्ये 05, नाशिक शहर 2 मध्ये 8, नाशिक ग्रामीणमध्ये 7, चांदवडमध्ये 5 जणांवर कारवाई करण्यात आली अशा प्रकारे एकूण कलम 135 व कलम 126 नुसार 261 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...