आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये 1 डिसेंबरपासून पुन्हा हेल्मेट सक्ती:नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई; पोलिस आयुक्तांचे आदेश

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्ते अपघातात विना हेल्मेट दुचाकी चालकांचा बळी जात असल्याच्या घटना वाढल्या आहे. विना हेल्मेट असलेल्या दुचाकींच्या अपघातात 83 चालकांनी जीव गमावला आहे. 261 चालक कायमचे जायबंदी झाले आहे. या वाढत्या अपघातांची दखल घेत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी हेल्मेट सक्ती लागू केली आहे.

1 डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती अधिक तीव्र पणे लागू केली जाणार आहे. तत्कालीन आयुक्त दिपक पांड्ये यांनी सुरू केलेल्या नो हेल्मेट नो पेट्रोल या कारवाईचे देशाभरात चर्च झाली होती. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर हेल्मेट सक्ती कारवाईला ब्रेक लागला होता.

दुचाकी अपघातात 83 चालकांचा गेला जीव

शहर व परिसरात रस्ते अपघातात वाढ झाली आहे. जानेवारी ते ऑक्टोंबर या कालावधीत विना हेल्मेट दुचाकी अपघातात 83 चालकांचा जीव गेला. तर 261 चालक आणि पाठीमागे बसलेले कायमचे जायबंदी झाले. दुचाकीस्वार अपघातनंतर रस्त्यावर पडून डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाल्याचे अपघातात केलेल्या निरक्षणात आढळून आले आहे. तसेच रस्त्यावर दुभाजकावर डोके आपटून मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अपघाताच्या गुन्ह्यात दाखल आहे. वाढते अपघात आणि अन्य जीवीत हानी टाळण्यासाठी मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 129/ 177 नुसार आता दुचाकी चालकांना हेल्मेट वापर करणे बंधनकारक आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवल्यास 500 रुपये दंडाची तरतुद आहे.

महामार्गवर घटले अपघात

राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची गस्त वाढवली आहे. पोलिसांची गस्त होत असल्याने भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्यांवर वचक बसला आहे. यामुळे महामार्गावर अपघात संख्या घटली आहे. मृत्यूचे प्रमाणही घटले आहे.

नागरिकांनी पाळवे नियम

शहरातील नागरीक कायदा व सुव्यवस्थेचे पालन करतात. वाहतुक नियमांचे पलान करण्यास शहरवासिय अघाडीवर आहेत. दुचाकी अपघात आणि त्यात होणारी जीवीत हानी रोखण्यासाठी दुचाकी चालवितांना हेल्मेट वापर करावा वाहतुक नियमांचे पालन करावे.

चांगल्या प्रतीची हेल्मेट वापरा

रस्ते अपघातात मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट गरजेचे आहे. काही दुचाकी चालक कारवाई टाळण्यासाठी रस्त्यावरील हेल्मेट घेतात. मात्र कमी दर्जाचे हेल्मेट मुळे डोक्याला गंभीर विजा होऊ शकते. मृत्यूही होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी उच्च दर्जाचे हेल्मेट वापर करावा.

बातम्या आणखी आहेत...