आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:महिलासांठी तक्रार निवारण समिती गठित न करणाऱ्यांवर होणार कारवाई

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमांतर्गत केलेल्या तरतूदीनुसार ज्या अस्थापनांमध्ये १० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी महिलांचा समावेश असेल अशा प्रत्येक कार्यालय अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्यासाठी सूचित केले आहे. ज्या कार्यालयांमध्ये तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येणार नाही, तेथे कलम २२ नुसार ५० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कार्यवाही हाेणार आहे.

अशा अस्थापना व कार्यालयांसाठी जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. संबंधितांनी या समितीकडे तक्रार दाखल करावी. असे आवाहन सदस्य सचिव स्थानिक तक्रार निवारण समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नासर्डी पुलाजवळ, 0253-2236368 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.

बातम्या आणखी आहेत...