आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Action Will Be Taken If Substandard Food Is Served A Surprise Inspection Of Nutrition In Eight Anganwads; Action Will Be Taken If Substandard Food Is Served

निकृष्ट अन्न दिल्यास होणार कारवाई:8 अंगणवाड्यांमध्ये उपायुक्तांनी दिली अचानक भेट, पोषण आहाराची झाली तपासणी

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका शाळेमध्ये निकृष्ट पोषण आहार पुरवला जात असल्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर समाज कल्याण विभाग ॲक्शन मोडवर आला असून या विभागाचे उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी आठ अंगणवाड्यांची अचानक तपासणी करून पोषण आहार कशा पद्धतीने दिला जातो याबाबत पडताळणी केली.

महापालिका शाळांमधील पोषण आहाराचे प्रकरण गेल्या अनेक वर्षापासून गाजत असून मध्यंतरी सिडको मधील एका शाळेमध्ये चक्क जेवणामध्ये अळ्या आढळल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित शाळेत पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची तयारी सुरू केली होती. पालिकेच्या अंगणवाड्यांमध्ये देखील पोषण आहाराचा पुरवठा केला जात असल्यामुळे तसेच येथे सहा वर्षाखालील मुले येत असल्यामुळे निकृष्ट पोषण आहार जाऊ नये या दृष्टिकोनातून डॉ. मेनकर यांनी पाहणी केली.

पंचवटी विभागातील नांदूर, मानुर, आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद भागातील अंगणवाडींना भेट देऊन मुलांची पटसंख्या, हजेरी याबाबत खात्री करण्यात आली. तेथील स्वच्छतागृह, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था अशा मूलभूत सोयी सुविधा जाणून घेतल्या. शाळांमधील वैद्यकीय आणि पोषण आहाराच्या व्यवस्थेबाबत चौकशी केली.

अंगणवाडीसाठी इमारत बांधणार

पालिका हद्दीतील अनेक अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही. इमारत नसलेल्या अंगणवाड्यांना प्राधान्याने इमारत उपलब्ध करून देण्याबाबत उपायुक्तांनी सांगितले.

3 महिन्यांनी होणार वैद्यकीय तपासणी

कुपोषित बालकांचे निदान होण्यासाठी दर तीन महिन्यांनी अंगणवाडीतील मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात एकूण ३५४ अंगणवाड्या असून प्रशासन आपल्या भेटीत तेथील समस्या व अडचणी जाणून घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...