आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Activities In Kalidasa On The Occasion Of The Nectar Festival Of Freedom; Spontaneous Response To Arangetram On The Concept Of Jallosh Freedom |marathi News

उपक्रम:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कालिदासमध्ये उपक्रम; जल्लोष स्वातंत्र्याचा संकल्पनेवरील अरंगेत्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री क्रांतिकारक ही संकल्पना घेऊन त्यावर पदन्यास सादर होतो तेव्हा उपस्थित रसिकही स्त्रीच्या कर्तृत्वाला सलाम करतात. याच संकल्पनेवर साेहा कुलकर्णी हिने भरतनाट्यम अर्थातच अरंगेत्रम सादर करताच रसिकांनी भरभरुन दाद दिली.

महाकवी कालिदास कलामंदिरात शनिवारी (दि. ४) अरंगेत्रममधून वीर रसावर आधारित पदन्यासाचा हा आविष्कार होता. ज्येष्ठ नृत्यांगना भारताच्या ख्यातनाम संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या भरतनाट्यमधील गुरू सुचेताताई चापेकर- भिडे यांनी सोहा कुलकर्णी हिस घुंगरू प्रदान करत नृत्य सादर करण्याची अनुमती दिली. मंत्र पुष्पांजलीने या पदन्यासास सुरुवात झाली. ख्यातनाम कवी लाखिदा यांची पल या कवितेतून स्त्री शक्तीला वंदन करण्यात आले.

या कवितेत स्त्री क्रांतिकारकांची नावे असल्याने नृत्यात त्यांच्या छबी उमटविण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर राणी लक्ष्मीबाईंच्या धाडसाची कथा, सुभाषचंद्र बोस यांच्या पहिल्या महिला गुप्तहेर आपल्या महिला साथीदाराला वाचविण्यासाठी वेषांतर कसे केले हे वर्णन या रचनेतून सोहा यांनी मांडले. पद्म प्रकारात येसूबाई सावरकर या स्वातंत्र्य संग्रामाचा अविभाज्य भाग कशा बनल्या व गांधीजीच्या विचारांनी भारावून राष्ट्रप्रेम व राष्ट्रध्वजासाठी आपले प्राण कसे वेचले हे राग अमृत्वार्शिनी, कल्याणी व आदि तसेच मिश्रचापू तालात अप्रतिम सादरीकरण केल्याने श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

मल्लरी ही खंडएकम तालातील मोहनम रागातील रचना सादर करण्यात आली. चतुश्रएकम तालातील गुणगान स्त्री कौतुकम सादर झाले. उत्तरार्धात पद्म मिश्रचापू, तिल्लाना पद्म अदिताल झाले. यावेळी तिल्लांनामध्ये वंदे मातरमचा जागर झाला. सृजननाद नृत्यालयाच्या वतीने हे पहिलेच अरंगेत्रमहोते. लिखाण ख्यातनाम कवी लक्ष्मीनारायण भाला तसेच पुण्याच्या नृत्यांगना तसेच कवी स्मिता यांनी केलेहोते. अरंगेत्रमचे दिग्दर्शन शिल्पा देशमुख नाकिल तर गायन ईश्वरी दसकर व सहकाऱ्यांनी केले. सूत्रसंचालन सुनेत्रा मांडवगणे व शिवानी पाठक यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...