आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोटरी क्लब ऑफ नाशिकरोडचा जपानी मियावाकी वृक्षलागवड, जैवविविधता, ग्रामीण शाळांसाठी शौचालये, तंबाखू विरोधी अभियान आदी उपक्रम आदर्शवत असल्याचे प्रतिपादन रोटरीचे प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांनी केले.रोटरी क्लब ऑफ नाशिकरोडने राबविलेल्या उपक्रमांना भेटी देऊन पाहणी केली.
त्यावेळी ते बाेलत हाेते. या कार्यक्रमात अध्यक्षा वर्षा जोशी, उपाध्यक्ष सुभाष थोरात, सचिव ग्यानेश वर्मा, उपप्रांतपाल सीमा पछाडे, मोनिका झुनझुनवाला, सलीम बटाडा, रणजित साळवी, हेमंत शिधये, फिरदोस कपाडिया, धनंजय जोशी, दिनेश शिंदे, महेश साळवे, सौमित्री दास, कुणाल शर्मा, अरुण स्वादी, डॉ. अमित गांगुर्डे, बाळकृष्ण साहू, प्रशांत बिसोई, डॉ. स्नेहल गांगुर्डे, अश्विनी सरदेशमुख आदी उपस्थित होते.
ग्यानेश वर्मा यांनी क्लबने वर्षभरात ४६ उपक्रम राबविले असल्याची सांगितले. इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्याशाळा, घरकुल म्युझिक सिस्टिमचे वाटप, वृद्धाश्रमात अन्नपूर्णा डे, दिव्यांग महिलांसमवेत रक्षाबंधन, गणपती डेकोरेशन कार्यशाळा, तंबाखूविरोधी अभियान, बेटी बचाव - बेटी पढाव, गरीब मुलांना इ-लर्निंग साहित्य वाटप आदींचा समावेश आहे.
डॉ. झुनझुनवाला म्हणाले की, रोटरीचे दोनशे देशांत बारा लाख सदस्य आहेत. त्यामुळे रोटरीच्या कार्यक्रम व उपक्रमांचा कधीच सूर्यास्त होत नाही. रोटरी फाउंडेशन जगात नंबर वन आहे. १९८५ पासून रोटरीने पोलिओ निर्मूलन मोहीम राबविणे सुरू केले. त्याला जगप्रसिद्ध बिल गेट्स यांचेही योगदान लाभत आहे. चॅरिटी नेव्हिगेटर संस्था गेल्या १४ वर्षांपासून रोटरी फाउंडेशनला चार स्टार देत आहे. या फाउंडेशनद्वारे जगभरात सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे जास्तीत जास्त संस्था, व्यक्ती रोटरीला देणग्या देतात.
खासगी कंपन्या सीएसआर निधी वितरणासाठी रोटरीलाच प्राधान्य देतात. रोटरीचे उपक्रम समाजोपयोगी तर असतातच परंतु, त्यांची अंमलबजावणीही प्रभावीपणे केली जाते. विविध क्षेत्रांत रोटरीचे सदस्य असल्याने अनेकांना विकासाच्या संधी मिळत असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.