आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ:अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलार; मेघराज राजेभोसले यांची हकालपट्टी

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलार यांची निवड करण्यात आली.वादग्रस्त कारकीर्द असलेले अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या बुधवारी (दि. 22) कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या दोन वर्षात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही संचालकांतील वाद झाले होते. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष होते.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात गेले काही वर्षात मोठा वाद सुरू होता. अध्यक्ष राजेभोसले यांच्या विरोधात अनेक संचालक एकत्र आले. त्यातूनच अध्यक्ष विरोधात उपाध्यक्ष असा वाद रंगला. या वादातून अध्यक्षांवर गेल्यावर्षी अविश्वास ठराव मंजूर केला. पण नंतर अध्यक्ष राजेभोसले यांनी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्यावर राजकीय खेळी करत पद टिकवून ठेवले होते. पुढे वाद वाढतच गेला. अध्यक्षांनी कार्यकारिणीची बैठक घेण्यास टाळाटाळ केल्याने महामंडळाचे कामकाज ठप्प झालयाचे कार्यकारी मंडळाचे म्हणने होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता दीड- दोन वर्षानंतर कार्यकारिणीची बुधवारी बैठक झाली. त्यात नवीन अध्यक्षपदी शेलार तर कार्यवाहपदी रणजित जाधव यांची निवड करण्यात आली.

महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महामंडळाच्या कार्यकारिणीने 26 नोव्हेंबर 2020 मध्ये अध्यक्ष राजेभोसले यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्या सभेचा इतिवृत्तांत बैठकीत मंजूर करावा असा विषय मांडण्यात आला. हा विषय कार्यकारणीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आजच्या बैठकीला मावळते प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, रणजित जाधव, सतीश बिडकर, पितांबर काळे, सतीश रणदिवे, निकिता मोघे, शरद चव्हाण हे संचालक उपस्थित होते.

भोसले यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आलेल्या आधीच्या बैठकीतला इतिवृतांत या सभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे अर्थातच भोसले यांचे अध्यक्षपदी संपुष्टात आले. महामंडळाचे एकूण १४ संचालक आहेत. बैठकीला मेघराज भोसले, वर्षा उसगावकर, संजय दुबे, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर अनुपस्थित होते. यावेळी अभिनेता विजय पाटकर, इम्तियाज बारगीर, मिलिंद अष्टेकर , प्रिया बेर्डे , अरुण चोपदार, अमर मोरे, सतेज स्वामी, बाळासाहेब बारामती, सदाशिव पाटील , निलेश जाधव, सुनील मुसळे, विजय ढेरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...