आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या कानाचा चावा घेताच तुकडा पडला:अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे कृत्य; मारहाणही केली

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजार समितीमध्ये मजुरी करणाऱ्या महिलेवर सहकारी हमालाने शौचालयात अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने नकार दिल्याने तिला मारहाण करत तिच्या कानाला चावा घेतल्याने कानाचा तुकडा पडल्याचा धक्कादायक प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडला. पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित हलाम पिंटू गौतम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार बाजार समिती मध्ये मजुरीचे काम करते. मध्यरात्री बाजार समितीमध्ये व्यापाऱ्याकडे भाजीपाला भरण्याचे काम आटोपून शौचालयात जात असतांना बाजारात हमाली करणारा ओळखीचा संशयित पिंटू गौतम याने रस्ता आडवला. महिलेला पुढे जाण्यात प्रतिबंध करुन तु माझ्या सोबत चल असे म्हणाला. महिलेने नकार दिला. संशयिताला नकार दिल्याचा राग आल्याने महिलेला अंगावर ओढून विनयभंग केला. एवढ्यावर न थांबता संशयिताने महिलेले ओढून शौचालयाच्या आडबाजुला नेत खाली पाडले. बळजबरीने महिलेच्या अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न केला.

महिलेवर बळजबरी

महिला ओरडत असल्याने संशयिताने हाताने तोंड दाबून ठेवत बळजबरी करत होता. अखेर महिलेने संशयिताला लाथ मारुन प्रतिकार केला असता संशयिताने महिलेचा कानाला चावा घेतला. हा चावा इतका भयानक होता की महिलेच्या कानाचा तुकडा पडला. महिलेने आरडाओरड केल्याने संशयिताने तेथून पळ काढला. काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. महिलेला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वरिष्ठ निरिक्षक डाॅ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

संशयिताचा शोध सुरू

महिलेच्या तक्रारीनुसार संशयिताच्या विरोधात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. तोपर्यंत संशयित फरार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. संशयित हा उत्तर भारतीय असून त्याच्या बद्दल पुरेसी माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगीतले.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न

बाजर समितीमध्ये रात्रीच्या वेळी परिसरातील बहुतांशी महिला मजुरीचे काम करतात. या महिलांना रात्रीच्या वेळी एकटे घरी जावे लागत असल्याने मजुर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारात महिल मजुरांवर यापुर्वी विनयभंगाचे प्रकार घडले आहे. मात्र भीतीपोटी महिला पुढे येत नाही.

बातम्या आणखी आहेत...