आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे दाखल:कमी वयातील कृत्य आले अंगाशी ; अल्पवयीन मुलांकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईनाका परिसरातील १९ वर्षीय मुलाने १५ वर्षांच्या मुलीला कोर्ट मॅरेज करण्याचे आमिष देत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. कालांतराने मुलगी गर्भवती झाली. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार देत संशयित पळून गेला. विवेक भाऊसाहेब निकम वय १९ रा. शिवाजी वाडी याच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार व पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे परिसरातीलच मुलासोबत प्रेमसंबंध होते. संशयिताने मुलीला आपण कोर्ट मॅरेज करू असे आमिष दिले. तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने ती ५ महिन्यांची गर्भवती राहिल्याचे समजताच त्याने लग्न करण्यास नकार देत पलायन केले. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले तपास करत आहेत.

बालपणाचे प्रेम बेतले मुलीच्या आयुष्यावर
पीडित मुलगी १० वर्षांची तर संशयित १४ वर्षांचा असल्यापासून प्रेमसंबंध होते. ५ महिन्यांपूर्वी मुलगी गर्भवती राहिली. कुटुंबियांना हा प्रकार लक्षात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कायदेशीरदृष्ट्या अडचण
दाेघेही अल्पवयीन असल्याने लग्न करण्यास कायदेशीरदृष्ट्या असमर्थ आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने गर्भपात करण्यासाठी पोलिसांत गुन्हा दाखल असणे आवश्यक आहे. मुलीने गर्भपात करण्यास नकार दिला आहे.

वैद्यकीय चाचणीला नकार
पीडित मुलीने वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिला. माझे बाळाचे बरे वाईट होईल या भीतीने मुलीने वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिल्याने कुटुंबियांपुढे मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

अल्पवयीन मुलाकडून मुलीचा विनयभंग; मानेचा घेतला चावा म्हसरूळ परिसरात अल्पवयीन मुलाने परिसरातील एका दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. तीने आरडाओरड केल्याने मुलाने तिच्या मानेवर चावा घेत तीला गंभीर जखमी केले. म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी सायंकाळी घरी जात असताना उद्यानाजवळ अकारावीच्या ओळखीचा मुलाने थांबवले. संशयिताने मुलीचा धरून तीला अंधारात ओढून नेले. संशयिताने मुलीला मारहाण करत तीचे तोंड दाबून ठेवत तीचे कपडे काढण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने प्रतिकार केला. त्यामुळे संशयिताने मुलीच्या मानेवर चावा घेत जखमी करत पळ काढला. मुलगी रडत रडत घरी गेल्यानंतर आईला संशय आला. तीने मुलीला विश्वासात घेत माहिती घेतली असता मुलीवर बळजबरी झाल्याचे निदर्शनास आले. म्हसरूळ पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना माहिती दिली. संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे तपास करत आहेत.

मुलगा पाेलिसांच्या ताब्यात
संशयित हा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पालकांना बोलवून घेत समज दिली. बाल न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला सोडून देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...