आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:व्यसन म्हणजे विनाश; रॅलीद्वारे अनाेखी जनजागृती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्यसनाच्या विळख्यात नागरिक, तरुणाई दिवसेंदिवस अडकत आहे. मात्र व्यसन म्हणजे विनाश असून यापासून सर्वांनी दूर राहिले पाहिजे, असा संदेश देत बीएपीएस स्वामीनारायण मंदिराच्या वतीने व्यसनविरोधी जनजागृती करण्यात आली.

जागतिक पर्यावरण दिन व तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधत रविवारी व्यसन विरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ४.३० वाजता पंचवटी कारंजा येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीत सहभागी चिमुकल्यांनी विविध वेशभूषा परिधान करीत तसेच हातात घोषवाक्यचे फलक हातात घेत व्यसनविरोधात जनजागृती करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साधुगणसह, महिला, लहान मुले यात सहभागी झाले होते. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना व्यसनापासून दूर राहण्याबाबत आवाहन करण्यात आले. पंचवटी कारंजा येथून प्रारंभ झालेली रॅली निमाणी बसस्थानक, जुना आडगाव मार्ग केवडीबन परिसरात असलेल्या स्वामी नारायण मंदिर येथे समारोप करण्यात आला. रॅलीचे नागरिकांनी स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...