आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरिक्त 1 लाख ध्वज खरेदीच्या फाईलला लेखा विभागकडून ब्रेक:प्रशासनाची भूमिका वादात; लेखा विभागाकडून केराची टोपली

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायम खरेदीत रस ठेवून असणाऱ्या महापालिकेने आता ‘हर घर तिरंगा’ मोहीमेच्या निमित्ताने चक्क आधीचे ध्वज शिल्लक असताना, नव्याने आपल्या स्तरावर 1 लाख ध्वज खरेदीसाठी केलेली प्रक्रिया वादात सापडली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्याकडून आलेल्या फाईलला पालिकेच्याच लेखा विभागाने केराची टोपली दाखवली आहे. दरम्यान, खाडे यांनी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याच परवागीनेच खरेदीची फाइल फिरवल्याचा दावा केल्यामुळे अतिरिक्त खरेदीत कोणाला रस असा प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्राच्या ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेला 2 लाख तिरंगा झेंडा वाटपाचे उद्दीष्ठ होते. त्यासाठी पालिकेने 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्टदरम्यान वाटपही सुरू केले. मात्र, दोन लाख झेंड्यापैकी तब्बल सव्वा लाख झेंडे सदोष असल्याचे समोर आल्यानंतर, 75 हजार झेंडे विक्रीसाठी उपलब्ध होते. दरम्यान, कोणीही खरेदीसाठी आलेला परत जावू नये यासाठी अतिरिक्त आयुक्त खाडे यांनी एक लाख झेंडे अतिरिक्त खरेदीचा निर्णय घेतला.

फाईल केराच्या टोपलीत

एवढेच नव्हे तर, ध्वजारोहणाच्या दिवशी पालिकेतील बांधकाम आणि नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांसाठी अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनाचे लोगो असलेले टी शर्ट, टोप्या खरेदीचा प्रस्तावही लेखा विभागाला पाठविण्यात आला. त्यासाठी जवळपास 36 लाखाची खरेदी होणार असल्यामुळे लेखा विभागाने अनेक प्रश्न उपस्थित करीत या फाईलवरच फुली मारली. पालिकेत कोणत्याही वस्तुची खरेदी करताना नियमानुसार निविदा मागणे गरजेचे आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार कोणतीही स्पष्ट माहिती न देताच खरेदीसाठी प्रक्रिया झाल्यामुळे लेखा विभागाने संबधित फाईल केराच्या टोपलीत टाकल्याचे समजते.

टी शर्टची विक्री

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी बांधकाम आणि नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांना ‘आझादी का अमृतमहोत्सव’ असा लोगो असलेले टी शर्ट व टोपी खरेदीची सक्ती केल्याची बाब चर्चचा विषय ठरली. सुरूवातीला साडे चारशे रूपयाला एक याप्रमाणे जवळपास पालिकेच्या साडे चार हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा गणवेश देण्याचा प्रयत्न हाेता मात्र, त्यास लेखा विभागाने ब्रेक लावल्यानंतर स्वखर्चातून काही अधिकारी व कर्मचारी असे 75 टी शर्ट व टोप्या खरेदी झाल्याचे पुढे आले आहे.

आयुक्तांच्या परवानगीनेच प्रक्रिया

महापालिका आयुक्तांच्या परवानगी एक लाख झेंडे खरेदी करण्यासह काही कर्मचाऱ्यांसाठी टी शर्ट व टोपी खरेदीचा प्रस्ताव दिला होता मात्र लेखा विभागाने थेट खरेदीला नकार दिल्यामुळे सीएसआर अॅक्टिव्टी तसेच स्वयंपुर्तीने विक्री करण्यात आली. -सुरेश खाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

बातम्या आणखी आहेत...