आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआडगाव-म्हसरुळ ते आडगाव आळंदी डावा तट कालवा पाटरस्त्याचे भाग्य उजळले आहे. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी एक कोटी रुपये आवश्यक हाेते. या कामांचा शुभारंभ नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या १५-२० वर्षांपासून अत्यंत जवळचा व शाॅर्टकट मार्ग असलेल्या या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक शेतकऱ्यांनी तसेच नगरसेवकांनी आमदार ढिकले यांच्याकडे पाठपुरावा केला.
संबंधित कामासाठी तरतूद धरून भूमिपूजनाचा नारळ वाढवण्यात आला. काम पूर्णत्वास येऊन या रस्त्याच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांची व नागरिकांची दैनंदिन वाहतूक अधिक सुलभ आणि सोपी हाेईल, असा विश्वास आमदार राहुल ढिकले यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी माजी सभापती उद्धव निमसे, माजी नगरसेविका शीतल माळोदे, सुरेश खेताडे, पूनम सोनवणे, भाई पुंजा माळोदे, संतोष भोर, बाळासाहेब झोमान, नितीन माळोदे, कैलास शिंदे, गणेश माळोदे यांच्यासह शेतकरी बांधव, नागरिक उपस्थित होते. या कामामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
विकास हाच ध्यास नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढणे हे माझे आद्य कर्तव्य असून त्यामुळे नागरिकांची प्रत्यक्ष भेटून त्यांना आवश्यक असलेली कामे प्रस्थावित केली जात आहे. मतदार संघाचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास आहे. -अॅड. राहुल ढिकले, आमदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.