आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 जानेवारीला‎ राज्यभरात उद्घाटन‎:आदिवासी कलांतून कायमस्वरूपी‎ रोजगारासाठी ‘आदिहाट'' प्रदर्शन‎

नाशिक‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी संस्कृती खूप संपन्न‎ आणि समृद्ध आहे. पाककृती,‎ हस्तकला, बांबूकला, चित्रकला,‎ औषधे यांनी आदिवासी समाज‎ समृद्ध आहे. त्यांच्या याच कलेचा‎ रोजगार निर्मितीसाठी उत्तमप्रकारे‎ वापर करता येऊ शकतो. याचाच‎ विचार करून, आदिवासी बांधवांना‎ कायमस्वरूपी वस्तू विक्रीसाठी‎ बाजारपेठ मिळावी आणि‎ रोजगारनिर्मिती व्हावी या हेतूने‎ आदिवासी विकास विभाग‎ ‘आदिहाट’ची सुरुवात येत्या‎ प्रजासत्ताक दिनापासून करत आहे.‎ ‘आदिहाट'' हा आदिवासी‎ विकास आयुक्तालय तसेच सर्व‎ अपर आयुक्त कार्यालये आणि‎ प्रकल्प कार्यालयांच्या ठिकाणी‎ असणार आहे. यामध्ये विविध‎ कलाकुसरीच्या वस्तू, आदिवासी‎ संस्कृतीशी निगडित साहित्य, वस्तू,‎ खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टॉल‎ असतील. यापूर्वी विविध ठिकाणी‎ होणाऱ्या प्रदर्शनात आदिवासी बचत‎ गटांनी सहभाग घेतला आहे. पण‎ "आदिहाट’च्या माध्यमातून कायम‎ स्वरुपी हक्काची विक्रीव्यवस्था‎ उपलब्ध होणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...