आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, या सरकारमध्ये सर्व आमदारांना केवळ गाजर दिले आहे, तुला मंत्री करतो, तुला मंत्री करणार असा टोला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर महिलांचा विश्वास जास्त असल्याचेही यावेळी आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
शिवसंवाद’ यात्रेचा दुसरा टप्पात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदारसंघातील मुंढेगाव येथून संवाद कार्यक्रमास सुरुवात झाली, यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले?
आदित्य ठाकरे म्हणाले की, मला अनेकदा लोक भेटतातज आणि सांगतात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंसारखा नेताच महाराष्ट्राला मिळाला नाही. राज्यात अनेक नवे उद्योग आणले, त्यामध्ये 80 रोजगार स्थानिक तरुणांना द्यावा लागणारी असे आपले सरकार असताना नियम केला. यासह राज्याचे मंत्रिमंडळात एकही महिला नाही. हे सरकार कोसळण्याचा आहे. हे महाराष्ट्राचे सरकार आहे की दिल्लीश्वरांचे सरकार ओह असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. या सरकारमध्ये ना महिला आहेत, ना तरुण आहे, ना कुणी शेतकऱ्यांचा आवाज असणारे यामुळे हे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, कारण सर्व आमदारांना तुला मंत्री करतो म्हणत गाजर दिले आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेेंनी लगावला आहे.
लोकांचे प्रश्न मागे पडले
आदित्य ठाकरे म्हणाले की,मुख्यमंत्री अनेकदा दिल्लीला गेले. मात्र, त्यांनी स्वत:साठी सर्व मागितले, राज्यासाठी काहीच मागितले नाही, त्यांनी राज्याच्या विकासासाठी काही मागितल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या का असा सवाल उपस्थितांना करत लोकांचे प्रश्न मागे पडल्याचा आरोपही केला आहे. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकात पुन्हा शिवसेनेचे भगवा मंत्रालयावर फडकविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.