आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंची आज नाशिकरोड येथे सभा:आगामी निवडणुकांसाठी रणनीती जाहीर करण्याची शक्यता, पक्षाकडून जोरदार तयारी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सोमवारी (दि. ६) सायंकाळी ६ ला नाशिकरोडला जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांकडून सभेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

आनंदऋषी शाळेमागील सुवर्णा सोसायटीच्या पटांगणावर ही सभा होणार आहे. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सभास्थळाची पाहणी करून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती ते जाहीर करण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...