आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमधून विमानसेवेचा विस्तार व्हावा, बंद झालेल्या सेवा पूर्ववत सुरू व्हाव्यात याकरिता आता आदित्य ठाकरे यांनीही केंद्रीय विमान वाहतूकमंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया यांना लिहिलेल्या पत्रात नाशिकसह राज्यातील पाच विमानतळांच्या विकासाबाबत मागणी केली आहे. नाशिक हे तीर्थस्थळ असून विमानसेवेची पूर्ण क्षमता असतांनाही येथील सुरू असलेल्या फ्लाइट्स बंद करून नाशिककरांवर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी यातून करण्यात आली आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिंधिया यांना बंद पडलेल्या विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी पत्रप्रपंच केला हाेता.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ५० विमानतळ, हेलिपॅडस् आणि पाेर्टस् यांचा विकास, निर्माण, पुनर्निर्माण केले जाणार असल्याची घाेषणा केली हाेती. त्यानूसार महाराष्ट्राला यात प्राधान्य दिले जावे असे साकडे आदित्य ठाकरे यांनी या केंद्रीयमंत्री सिंधिया यांना घातले आहे. यात, मुंबईला पुढील १० वर्षात तिसऱ्या विमानतळाची गरज असून पालघर जिल्ह्यात हे विमानतळ उभारल्यास त्याचा फायदा कृषी, प्रवासी तसेच पार्किंग यांसारख्या सुविधांसाठी करता येऊ शकेल, त्याबराेबरच, अजिंठा लेण्यांसाठी राेज येणाऱ्या हजाराे पर्यटकांच्या दृष्टीने फर्दापूर येथे विमानतळाची उभारणी करावी, यासाठी बुद्धिस्ट देशांची मदत घेता येऊ शकते याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचे भिजत पडलेले घाेंगडे दूर करून पुणेकरांची आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठीची क्षमता लक्षात घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.