आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये अंगणवाडी इमारतीच्या खर्चाला प्रशासनाची मंजुरी:163 नवीन इमारतीसाठी 18 कोटी 41 लाखांचा निधी मंजूर

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा वार्षिक याेजनेतून जिल्ह्यासाठी 163 नवीन अंगणवाडी इमारतींसाठी 18 काेटी 41 लाख रुपये खर्चाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. एका अंगणवाडीसाठी 11 लाख 30 हजार रूपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

ज्या ठिकाणी अंगणवाडी बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे अशा उघड्यावर, समाज मंदिरात, खासगी जागेत, ग्रामपंचायत जागेत भरणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्राधान्याने इमारती मंजूर करण्यात आल्या आहेत. 2022-23 अंतर्गत मंजूर नियत्वय रुपये 17 कोटी मधून मागील वर्षाचे दायित्व जाता 12 कोटी 21 लाख रुपये निधीच्या दीडपट 18 कोटी 32 लाख निधीमधून प्रति अंगणवाडी 11 लाख 30 हजार रुपये खर्चास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केल्याचे महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी सांगितले. एकुणच 2022-23 च्या नियोजनात महिला व बालविकास विभाग आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

अनेक ठिकाणी धाेकादायक अंगणवाड्या

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या अंगणवाड्यांपैकी बहुतांश अंगणवाड्या धाेकादायक इमारतीच्या ठिकाणी भरवल्या जात हाेत्या. काही ठिकाणी छताला काैले नाहीत तर काही ठिकाणी इमारतच माेडकळीस आल्याने उघड्यावर अंगणवाड्या भरवल्या जात हाेत्या. अंगणवाड्यांसाठी नवीन इमारती मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसह स्थायी समितीच्या बैठकीत तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांकडून वारंवार मागणी केली जात हाेती. त्यामुळे प्रशासनाने नवीन अंगणवाडी इमारतींचा प्रस्ताव तयार केला हाेता. या प्रस्तावास मान्यता मिळाल्याने आता लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ज्ञानाचे धडे दिले जातील.

तालुकानिहाय अंगणवाडी इमारती

बागलाण (25), चांदवड (24), इगतपुरी (8), मालेगाव (35), नांदगाव (26), निफाड (20), सिन्नर (19) , येवला (6)

बातम्या आणखी आहेत...