आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून राेजी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत याेगदिनाचा कार्यक्रम व त्यानंतर श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे हाेणाऱ्या शिलान्यास कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शाह यांचा दाैरा निश्चीत झाला असून प्रशासकीय व गुरुपीठाची तयारीचा आढावा घेण्यात आला. गुरुपीठावर भव्य असा 40 हजार चाैरसफूटाचा मंडप व 1 हजार चाैरस फूटाचे व्यासपीठ उभारण्यात येत असल्याची गुरुपीठाचे चंद्रकांत माेरे व नितीन माेरे यांनी संयुक्तपणे दिली.
सद्गुरु प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल शिलापूजन समारंभास मंगळवारी (दि. 21) दुपारी 11 ते 1.30 वाजेपर्यंत केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी गुरुपीठ सज्ज होत असून सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अशोक चव्हाण, दादा भुसे, धनंजय मुंढे, खासदार हेमंत गोडसे, उन्मेश पाटील, माजी मंत्राी धाकृष्ण विखे पाटील, आमदार सिमा हिरे, देवयानी फरांदे, हिरामण खोसकर, राहुल ढिकले आदी उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यानंतर शहा यांच्यासह प्रमुख पाहूणे भोजन घेऊन गुरुपीठ आवारातच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
अत्याधुनीक यंत्रणाद्वारे माेफत उपचार
गरजू रुग्णांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे माेफत उपचार रुग्णालयात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती गुरुमाऊली दिली. हृदय, किडनी, मेंदू, स्त्री रोग, अस्थिरोग अशा सर्वच आजारांवर उपचार मिळतील. एम.आर.आय. सीटी स्कॅन अशा अत्याधुनिक तपासण्याही होतील. तीन लाख चौर फुटांचे हे सात मजली हॉस्पिटल सर्वांना वरदान ठरणार असून येथे दवा व दुवा असा संगम साधला जाईल. 40 हजार स्क्वेअर फुटाचा मंडप, एक हजार चाैरस फुटांचे व्यासपीठ यांची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. मंडपातील बैठक व्यवस्था, भोजन व्यवस्था सुक्ष्मपणे नियोजन केले जात आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद
शहा यांच्या दाैऱ्यानुसार साेमवारी (दि.20) शासकीय विश्रामगृह त्र्यंबकेश्वर येथे रात्री 10.00 वा.आगमन मुक्काम करणार असून 21 जून मंगळवारी सकाळी 6.15 वा. त्र्यंबकेश्वर येथे याेग दिनाच्या कार्यक्रमास उपस्थिती.तिथून 7.30 ते 10 वाजेपर्यंत राखीव. तिथून त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी जाणार असून 10.45 मिनीटांनी याेग विद्याधाम आश्रम येथे रवाना तिथून 11.15 मिनीटांपर्यंत आश्रमात राखीव. तिथून 11.30 ते दुपारी 12.30 वा. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथे सदगुरु मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पीटलच्या शिलापुजन कार्यक्रमासाठी आरक्षित. दुपारी 12.30 ट्रस्ट पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर संवाद व भाेजन हाेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.