आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:सातपूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून प्रबाेधनात्मक रॅली

सातपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मविप्रच्या सातपूर येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व मायको हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गावात प्रबाेधनात्मक जनजागृती रॅली काढण्यात आली. मायको हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. रुचिता पावसकर यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयात ‘एड्स’ या विषयावर अश्विनी भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर प्राचार्य डॉ. डी. जी. उशीर, सकाळ सत्र प्रमुख डॉ. सुरेखा गायकवाड, हेमांगिनी जोशी, शारदा जाधव, ज्योती चव्हाण तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.मच्छिंद्र शेंडगे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. रुक्मिणी उफाडे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा पिंगळे यांनी तर आभार प्रा. वर्षा मोगल यांनी मानले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...