आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंनतर अमित यांच्याकडून मनपाची तयारी:अमित ठाकरेंचा नाशिक दौरा; 6 ते 9 ऑगस्ट जिल्ह्याचा दौरा करणार

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नाशकात दाेन दिवस तळ ठाेकून मेळावे व बैठका घेतल्यानंतर आता त्यांचे चुलत बंधू तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे महासंपर्क अभियानाचा भाग म्हणून 6 ते 9 ऑगस्ट असे चार दिवस नाशिक दाैऱ्यावर येत आहे.

राज्यातील सत्तांतर घडामाेडीपासून चार हात दूर राहत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले पूत्र अमित यांना राज्यव्यापी दाैऱ्यावर पाठवले आहे. मनविसे अध्यक्ष असलेले ठाकरे यांनी यापूर्वी काेकण तसेच मुंबईतील काही भागात दाैरे करून युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काही महाविद्यालयात जावून तेथील विद्यार्थ्याचे प्रश्नही जाणून घेतले. दरम्यान, आता अमित हे नाशिकमध्ये येत असून एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील बांधबंदिस्ती केली जाणार आहे. दाैऱ्यात प्रामुख्याने काही महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहे. विद्यार्थ्यांना मनसे विद्यार्थी संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन देखील केले जाणार आहे.मागील आठवड्यात मनसेचे जिल्हाप्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर व समन्वयक सचिन भोसले यांच्याशी मुंबईत चर्चा करण्यात आल्यानंतर दौरा निश्चित करण्यात आला.

असा आहे महासंपर्क अभियान दौरा

सहा ऑगस्ट- इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुका.

- सात ऑगस्ट- निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव व चांदवड तालुका.

- आठ ऑगस्ट- सटाणा- देवळा, कळवण, दिंडोरी, हरसुल, सुरगाणा, त्रंबकेश्वर तालुका.

- 9 ऑगस्ट- नाशिक शहर, पूर्व नाशिक, मध्य नाशिक, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ.

बातम्या आणखी आहेत...