आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणरायांपाठोपाठ आज गौरीचे आगमन:ढोल ताशाच्या गजरात, गौराईचे थाटामाटात स्वागत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पारंपरिक गौरी गीते गात माेठ्या थाटामाटाने शनिवारी (दि.9) स्वागत झाले. लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या सायंकाळी सुवासिनींनी वाजत गाजत दारात पुजन करत घरात स्थापना करण्यात आली.यानंतर गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली. गौरी पुजनाचा रविवारी (दि.10) सकाळी 6 वाजेपासून सांयकाळी 7.39 पर्यंत शुभमुहूर्त असल्याची माहिती पुरोहित व गोदावरी मंदिराचे पुजारी आलोक गायधनी यांनी दिली.

अखंड सौभाग्यासाठी व कुुंटूबांच्या समुध्दीसाठीभाद्रपद महिन्यात गौरीची पूजा केली जाते.गेल्या दोन वर्षांपासून या उत्सवावर काेराेनाचे सावट हाेते. यंदा मात्र सर्व निर्बंध हटल्याने घराेघरी माेठ्या उत्साहात गाैरीचे आवाहन करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या पूजेत शनिवारी गौरीचे ढाेल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत स्वागत करण्यात आले. उंबरठ्यावर धान्य भरलेले माप ओलांडून गौरींना गणपती, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवत घराेघरी पांरपारिक पध्दतीने प्रतिष्ठापना करण्यात आली.गौरी कशाच्या पाऊली आली गं, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली गं' असे पारंपारिक गीते यावेळी महिलांनी म्हणत गाैरीचे स्वागत केले.काही ठिकाणी या गौरी पाटावर विराजमान होतात, तर काही ठिकाणी उभ्या गौरी, काही ठिकाणी बिन हाताच्या उभ्या आणि खड्यांच्या गौरींची स्थापन करण्यात आली.

रविवारी फुलवरा, नव्या साडया, दागिने अशी सजावट करत पंचपक्वान्ना,फराळ, विविध प्रकारच्या मिठाईचे नैवेद्य दाखवत गाैराईचे रविवारी पूजन केले जाणार आहे.यासाठी घराेघरी जय्यत तयारी करण्यात आली आहे.गेल्या दाेन वर्षांपासूनचे काेराेनाेचे निर्बंध यंदा हटल्याने यंदा सर्वत्र माेठा उत्साह पहावयास मिळाला.

बातम्या आणखी आहेत...