आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिष दाखविले:मुलीसह प्रेयसीस साेडून तरुणाने ठाेकली धूम ; पिडित मुलीने मालवणी पोलिसांत केली तक्रार दाखल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमसंबंध ठेवत रजिस्टर मॅरेज करण्याचे आमिष देत युवकाने युवतीसोबत शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती केले. तिने मुलगी जन्म दिल्यानंतर दोघींना वाऱ्यावर सोडून प्रियकराने पलायन केले. अंबड पोलिस ठाण्यात संशयित मोजेस बाबाभाई चुदेसराद (३२) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित ३१ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, मालवणी येथे राहणारा संशयित मोजेस याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघे रजिस्टर मॅरेज करणार असल्याने संशयित युवतीला घेऊन अंबड परिसरात सहा ते सात महिन्यांपासून वास्तव्यास होता. तीन वर्षांपूर्वी दोघांना मुलगी झाली. मुलगी नातेवाइकांना दत्तक दिली. युवती दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. तिने दोन महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला. तेव्हापासून संशयिताच्या वागण्यात बदल झाला. दोघींना सोडून संशयिताने पलायन केले. नातेवाइकांच्या मदतीने युवतीने मालवणी पोलिसांत तक्रार दिली. घटना अंबड येथे घडल्याने हा गुन्हा अंबड पोलिसांना वर्ग करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...