आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांचे आश्वासन:पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदाेलकांचा पायी मोर्चा स्थगित

सिडको2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी या मागणीसाठी नाशिक ते मुंबई मंत्रालय या दरम्यान अर्धनग्न पायी मोर्चा मंगळवारी सकाळी निघाला होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा सुरू होताच आमदार सीमा हिरे यांनी आंदाेलकांची भेट घेतली. त्यांनी आंदाेलनकर्त्यांना पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घालून देत पोलिस ठाण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

सामजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे, रामदास दातीर यांच्यासह नागरिक जमा झाले. एक्सलो पाॅइंट येथून मुंबईकडे रवाना झाले. पुढे महामार्गावर गरवारे पॉइंट येथे मोर्चेकऱ्यांची आमदार सीमा हिरे यांनी भेट घेतली. सर्व त्रुटी दूर करून पाेलिस स्टेशनची मागणी मान्य करण्याचे आश्वासन पालकमंत्री भुसे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...