आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:पहिल्या यादीनंतर 50 टक्के विद्यार्थ्यांचे अकरावीत प्रवेश

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी पहिली यादी जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या १२ हजार ६२३ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ५० टक्के म्हणजेच ६ ८६८ विद्यार्थ्यांचे कॅप राउंडद्वारे प्रवेश पूर्ण झाले आहेत. तर कोटा अंतर्गत ७४५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.

पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शनिवारी (दि. ६) अंतिम मुदत आहे. पहिल्या यादीनुसार १६ हजार ९५९ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ६२३ विद्यार्थ्यांची निवड झाली. यात कला २०८१ तर वाणिज्य ४२१८ तर विज्ञान शाखेच्या ६१७७ विद्यार्थ्यांची निवड झाली. यात ९ हजार १२३ विद्यार्थ्यांना आवडीची शाखा व प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहेत.

यातील ६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य असेल. तर दुसऱ्या क्रमांकापासून ते दहाव्या क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी प्रविष्ट होता येईल. दुसऱ्या यादीपूर्वी या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीचा कटऑफ लक्षात घेऊन पसंतीक्रम बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...