आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिंदाल पाॅलिफिल्म्स कंपनीतील स्फोटाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे प्रशासनाला आदेश दिल्यानंतर अखेर दोन दिवसांनी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली प्रांताधिकारी व तहसीलदारांची समिती नेमण्यात आली आहे. चाैकशी आणि तपासणी करून ही समिती शासनाला अहवाल सादर करणार आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ही माहिती दिली. दरम्यान, मंगळवारी (दि.३) सायंकाळी ५ पर्यंत मनपा अग्निशमन विभागाच्या ३ व्हॅनद्वारे आग आटोक्यात आणण्याचे काम सुरूच होते.
दुर्घटना होऊन तीन दिवस उलटल्यानंतरही कंपनी व्यवस्थापनाने अपेक्षित प्रश्नांची स्पष्ट उत्तरे प्रशासनास दिलेली नाहीत. थर्माेफ्युरी हिटिंग चेंबरमधील गडबड हेच स्फाेटाचे कारण : थर्माेफ्युरी हिटिंग चेंबरमधील गडबड या भीषण स्फाेटामागील कारण असल्याची दाट शक्यता अग्निसुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कंपनीच्या ज्या विभागात हा स्फाेट झाला तेथे पाॅलिफिल्म्सचा टाकाऊ माल वितळवला जाताे, त्यासाठी थर्माेफाइड हिटिंग चेंबरचा वापर केला जाताे, याच्या पाइप्समध्ये गरम आॅइल वाहत असते. येथे माल वितळल्यानंतर त्याचे रूपांतर कच्चा मालामध्ये हाेते. त्यानंतर पुन्हा त्यापासून फिल्म बनविल्या जातात. आॅइल बर्नरचे काम करणाऱ्या याच थर्माेफाइड हिटिंग चेंबरमध्ये झालेली गडबड घटनेचे कारण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.