आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामान्सून दाखल झाल्यानंतर सुमारे दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी (दि.२२) राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. दरम्यान, चार दिवस राज्यात सर्वत्र हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
राज्यात मान्सून ११ ते १२ जूनदरम्यान दाखल झाला होता. बुधवारी दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत होती, मात्र तीन वाजेपासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली. विदर्भ, मराठवाड्यातही पावसाला अनुकूल वातावरण होते. देशात उत्तरेतील राज्यांसह केरळ, कर्नाटक, महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत जोरदार पाऊस कोसळत आहे. रविवारपर्यंत बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असून मुंबई, कोकणसह गोव्यात धुवाधार पावसाचा अंदाज असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. मध्य महाराष्ट्रातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, अकोला, जुन्नर, आंबेगाव, मुळशी, मावळ, लोणावळा, जावळी, पाटण, शाहुवाडी, गगनबावडा, राधानगरी या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यात बुधवारी झालेला पाऊस (मिलिमीटर)
माथेरान ५५, जळगाव ११, सांगली ३१, जालना २, नाशिक ३०, पणजी १८, रत्नागिरी २, डहाणू ७, उदगीर ४, कोल्हापूर ५, महाबळेश्वर २,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.