आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik News, Nashik Update, Nashik Municipal Corporation. Rain Water Will Be Stored In Nashik's Bullion Market Again, MNS Warns Of Agitation

महापालिका करतेय काय?:नाशिकच्या सराफा बाजारात पुन्हा होणार तुंबापुरी; सफाईकडे दुर्लक्ष केल्याने मनसे आक्रमक

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यामध्ये सराफ बाजार, दहीपूल, शुक्ल गल्ली आदी भागांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे 'तुंबापुरी' होत असल्याचा अनुभव ताजा असताना यंदाही या भागांमधील पावसाळा पूर्व सफाईचा कानाडोळा केला जात असल्यामुळे मनसेचे शहर समन्वयक सचिन भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांना वारंवार फोन केल्यानंतरही 'बघू या, करू या' असे उत्तर दिले जात असून येत्या दोन दिवसात त्यांच्याकडून सफाई सुरू न झाल्यास मनसे स्टाइल आंदोलन छेडूच्या निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कुठे साचते पाणी?

गोदावरीच्या किनार्‍यावर अत्यंत दाटीवाटीने मेन रोड, सराफ बाजार, दहीपूल, भद्रकाली हा परिसर वसलेला आहे. या भागामध्ये अनेक अरुंद रस्ते असून, येथे दाटीवाटीने वाडे वसल्यामुळे येथे पावसाळी गटार योजनेसाठी अत्यल्प जागा मिळालेली आहे. त्याठिकाणी बाजारपेठ असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचतो. हा कचरा बराच वेळा पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या ड्रेनेजमध्ये अडकून पाणी तुंबते. खास करून ड्रेनेजवरील ढाप्यामध्ये कचरा अडकल्यामुळे पाणी वाट मिळेल त्या पद्धतीने वाहते. त्याचप्रमाणे या भागात पूर्वीचा सरस्वती नाला वाहत असल्यामुळे त्या माध्यमांमधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जमा होते. या सर्वांचा परिणाम म्हणून दरवर्षी पावसाळ्यामध्ये सराफ बाजार, शुक्ल गल्ली, भद्रकाली, दहीपुल या परिसरामध्ये गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी होते.

लोकप्रतिनिधी येतात, पण...

गेल्या तीन हजार वर्षांमध्ये पावसाळापूर्व सफाई न झाल्यामुळे या ठिकाणी सातत्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहे. दरवर्षी पावसाचे पाणी तुंबल्यानंतर बाजारपेठेमधील नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रमुख लोकप्रतिनिधी येतात, सूचना व आश्वासने देतात व प्रत्यक्षात मात्र दरवर्षी परिस्थिती 'जैसे थे' असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. यंदाही स्थानिक अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही पाहिजे त्या पद्धतीने सफाई होत नसल्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये प्रत्येक ड्रेनेजची साफ-सफाई करावी, पाण्याला अवरोध निर्माण होईल अशा पद्धतीने साचलेला कचरा हटवावा तसेच बांधकाम साहित्याचा मलबा उचलावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा भोसले यांनी दिला आहे.

तर महापालिकेची जबाबदारी...

सराफ बाजार, शुक्ल गल्ली, दहीपूल या भागात दरवर्षी पावसाचे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचून बाजारपेठेचे नुकसान होते तसेच स्थानिक नागरिकांनाही मनस्तापाचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेत महापालिकेने तात्काळ सफाई करावी. अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन केले जाईल व जबाबदारी महापालिकेची असेल.

- सचिन भोसले, शहर समन्वयक, मनसे

बातम्या आणखी आहेत...