आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या २४ वर्षांत नााशिक महापालिकेत नवीन नाेकरभरती न झाल्यामुळे रिक्त झालेल्या अडीच हजार पदांपैकी अत्यावश्यक सेवेतील ७०६ पद भरतीचा गाेंधळ सुरूच आहे. विधान परिषद पदवीधर निवडणूक आचारसंहितेमुळे आयबीपीएस संस्थेमार्फत भरती प्रक्रियेचा करार रखडला असताना आता या कंपनीने प्रक्रिया करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे प्रस्ताव सादर केला असून त्यांना तत्त्वत: मान्यता दिल्याचे सांगितले जाते. नाशिक महापालिकेत ‘क’ वर्ग आकृतिबंधानुसार ७०८२ इतके पदे मंजूर असताना, जेमतेम ४५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.
जवळपास अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अशातच, काेराेना काळात अत्यावश्यक पदे भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली मात्र पहिली अडचण, २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याची समाेर आले. पालिकेने पाठपुरावा केल्यावर, अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली. मात्र, भरतीचे शिवधनुष्य उचलणार काेण हा प्रश्न आहे. यापूर्वी टीसीएसने प्रक्रिया करण्यास नकार दिला हाेता तर आयबीपीपीएस कंपनीने पुढकार घेतला हाेता. मात्र, कराराच्या अटी व शर्तींवर स्वाक्षरी करण्याची वेळ आल्यानंतर त्यांनी नकार दिला. अशातच, सुधारित पदांचा आराखडा तयार करताना प्रशासनाने ११ विभागांच्या सेवा व शर्ती नियमावलीत बदल करीत भविष्यात ज्यांची गरज नाही अशी ५११ पदे रद्द केली. त्यात बिगारी संवर्गातील ३६२ पदे, खत प्रकल्पावरील ८४ पदे तसेच अन्य विभागातील तसेच सुरक्षारक्षकांमध्ये वॉचमन संवर्गातील ११६ तसेच माळी संवर्गातील ६४ पदे मंजूर आहेत.
भरतीला चालना मिळण्याची शक्यता
आयपीबीएस कंपनीने नकार दिल्यानंतर, पुन्हा टीसीएस कंपनीकडे माेर्चा वळवला आहे. सकारात्मक बाब म्हणजे, त्यांनीही प्रतिसाद दिल्याने चालना मिळू शकते, अशी माहिती उपायुक्त मनाेज घाेडे-पाटील यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.