आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:मनुस्मृतीच्या पुरस्कर्त्यांच्या विराेधात प्रबाेधनाचा विचार कृतीत आणणे गरजेचे

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुस्मृतीवर आधारलेली समाजव्यवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणारी अदृश्य यंत्रणा कार्यरत असते. या यंत्रणेविराेधात प्रबोधनाचा विचार मांडून तो कृतीत आणणे हाच त्यावरील महत्त्वाचा उपाय ठरताे, असे प्रतिपादन नेवासा महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता गोविंद पानसरे यांनी केले.डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे १०७ वे पुष्प गुंफताना त्या ‘बहुजनांच्या मानगुटीवर पुन्हा मनुस्मृती’ या विषयावर बोलत होत्या.

सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. २०) हे व्याख्यान झाले. प्रा. पानसरे म्हणाल्या, डॉ. दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या खुनाचे मास्टरमाइंड वेगळे असतील, पण प्रत्यक्ष मारेकरी मात्र बहुजनच आहेत. भाजपला मतदान करणारेही बहुजनच आहेत. बहुजनांवर अन्याय करून त्यांना आपल्या विचारधारेच्या बाजूने वळवले जाते. समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी अदृश्य यंत्रणा कार्यरत असते. मात्र, आपण चिकित्सा करणे सोडून दिले असल्याने ती कोणाच्या लक्षात येत नाही.

आर्थिक प्रश्नांबाबत लोक लवकर संघटित होतात. पण सांस्कृतिक दहशतवादाला मात्र बळी पडताना दिसतात. व्यवस्थेकडून स्त्रीलाही कायम अबला असल्याची जाणीव करून दिली जाते. या यंत्रणेविरोधात प्रबोधनाचा विचार मांडून कृती करण्याची जबाबदारी सर्वांच घटकांची आहे. यावेळी व्यासपीठावर राजू नाईक उपस्थित होते. व्याख्यानास मान्यवरांसह नागरिकांची माेठी उपस्थिती हाेती.

परतीचे दरवाजे बंद झाले नसते तर श्रद्धा वाचली असती
दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर या वसईतील युवतीच्या खून प्रकरणाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असे पानसरे म्हणाल्या. श्रद्धाने समाजाची चौकट मोडण्याचा प्रयत्न केला म्हणून तिचे घरी परतण्याचे दरवाजे बंद झाले. सामाजिक प्रतिष्ठेपायी तिला तिच्या पालकांनी घरात घेतले गेले नाही. तिच्या परतीचे दरवाजे बंद झाले नसते तर पुढील अनर्थ टळला असता, असेही प्रा. स्मिता पानसरे यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...