आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणे यांची टीका:अयोध्येसाठी वयाची अट, आदित्य ठाकरे लहान आहेत : नितेश राणे

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी वेगात असल्याची सध्या चर्चा आहे. यावर टीका करताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अयोध्येत वयाची अट आहे. आदित्य लहान आहेत, त्यांना तेथे प्रवेश आहे का, अशी आदित्य ठाकरेंवर उपहासात्मक टीका केली. त्याचबरोबर, दौऱ्यापूर्वी ज्ञानवापीची भूमिकाही शिवसेनेने स्पष्ट करावी, असेही आव्हान दिले.

नाशिक येथे आक्रोश मोर्चानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राणेंनी शिवसेनेच्या सर्वच नेत्यांवर चौफेर टीका केली. राणेंनी आदित्य ठाकरेंना अजून लहान असल्याचे संबोधिले, अन् पुन्हा नवा वाद अोढवून घेतला. दरम्यान, भाजपने सर्वच बाबतीत स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्वाचा आव आणतो, केवळ बोलून हिंदुत्वाचे ढोंग बंद करावे. त्यांनी कृतीतून सिद्ध करुन दाखवावे. त्याआधी आदित्य यांनी ज्ञानवापीबाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...