आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणाबाजी:कब्रस्तानमध्ये बुजवून घेत आंदोलन ; मनपाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी

सिडको/नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कब्रस्तानचा वाद मिटत नसल्याने संतप्त झालेल्या मुस्लिम बांधवांनी गौळाणेरोड येथे खड्डा खोदत त्यात बुजवून घेत आंदोलन केले. मनपाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुमारे पाच तास सुरू असलेले हे आंदोलन इंदिरानगर पोलिसांनी तसेच मान्यवरांनी यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले.

२०१३ साली गौळाणेरोडवर कब्रस्तानासाठी तीन एकर जागा देण्यात आली. मात्र यातील काही जागा शेतकऱ्याच्या ताब्यात आहे. ती जागा मिळावी यासाठी अजिज तांबोळी व नुरूद्दीन शेख यांनी कब्रस्तानात खड्डे खोदून स्वतःस अर्धवट बुजवून घेत आंदोलन केले. इंदिरानगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवीदास वांजळे, तसेच शिवाजी चुंभळे, नगरसेवक प्रवीण तिदमे आदींनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...