आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात अग्निहोत्र आणि वेद यांना प्राचीन परंपरा असून तिचे संरक्षण, संवर्धन होणे गरजेचे आहे. अशा समाजाेपयोगी व स्तुत्य उपक्रमासाठी शृंगेरी शंकराचार्य मठ नेहमीच सहकार्य करेल, असे आश्वासन मठाचे व्यवस्थापक राम गोपाल अय्यर यांनी ब्रह्मरत्न पुरस्कारप्रसंगी दिले.
पंचवटीतील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान या निवासी गुरुकुलातर्फे दक्षिणाम्नाय जगद्गुरू शंकराचार्य श्री भारती तीर्थ महास्वामी व जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्युत शेखर भारती महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. संस्थेतर्फे सरदार चौकातील शृंगेरी शंकराचार्य मठात पुणे येथील अग्निहोत्रधारक वेदमूर्ती विश्वेश्वर विनायकशास्त्री पारखी, नागपूर येथील आहिताग्री वेदमूर्ती विवेक रमेश पांढरीकर व शहरातील दत्तधाम येथील वेदमूर्ती संदेश मेधशाम पटवर्धन यांना ब्रह्मरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचे सचिव वेदमूर्ती रवींद्र पैठणे यांनी प्रास्ताविक केले. भालचंद्र शौचे, रामगोपाल अय्यर, विश्वस्त गोविंद पैठणे, हरिभक्त परायण दत्तात्रय पैठणे पाठशाळेचे अध्यापक घनपाठी हरीश जोशी, वारे शास्त्री आदी उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना पुणे येथील विश्वेश्वरशास्त्री पारखी यांनी आयोजक पैठणे यांच्या महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करत महाराष्ट्रातील वेदपाठ शाळा प्रथमच अग्निहोत्री यांचा असा सन्मान करीत आहे.
अशी संमेलने, उपक्रम नेहमी होण्याची गरज प्रतिपादित केली. महाराष्ट्रातील संपूर्ण १५ अग्निहोत्री महापुरुषांना त्यांच्या स्थानावर जाऊन प्रत्येकी १५ हजार रुपये अग्निहोत्र सन्मानदक्षिणा समर्पण केली. प्रत्येकाने वेदाचे अध्ययन करून त्याप्रमाणे उत्तम आचरण करावे, अशी अपेक्षाही वेदमूर्ती पारखी यांनी व्यक्त केली. कविता कवीश्वर यांनी सूत्रसंचालन तर वेदमूर्ती गोविंद पैठणे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.