आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:इंटनिस‌ फाइन केमिकल्स मध्ये व्यवस्थापन व कामगारांत करार; तीन वर्षांत हाेणार 10,700 वेतनवाढ

सिन्नर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुसळगाव येथील औद्योगिक वसाहतीतील इंटनिस‌् फाइन केमिकल्स लिमिटेड कारखान्यात वेतनवाढ करार झाला. कामगारांना तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने १० हजार ७०० रुपयांची वाढ देण्यात येणार आहे. कराराचे औद्योगिक क्षेत्रात स्वागत करण्यात येत आहे.

आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेना व व्यवस्थापनात कराराबाबत चर्चा झाली. महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस रवी देवरे, चिटणीस फरान खान, योगेश लोंढे व कंपनी व्यवस्थापनाचे एल. जी. पुत्रण, मानव संसाधन विभागाचे मुख्य व्यवस्थापक विलास नाठे, वरिष्ठ व्यवस्थापक रघुनाथ मेहत्रे आदी उपस्थित होते.

दहावी, बारावी व पदवी परीक्षेत ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या कामगार पाल्याचा शैक्षणिक भत्त्यातून गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरस्कार देऊन पाल्यास सन्मानित केले जाणार आहे. मूळ पगार व महागाई भत्त्याच्या २० टक्के दिवाळी बोनस देण्याचा करार झाला आहे.

कामगार व कुटुंबाला विमा संरक्षण
तीन वर्षांसाठी सीटीसीमध्ये १० हजार ७०० रुपये पगारवाढ करण्यात आली. कामगार व कुटुंबाला दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण, कामगारांना कंपनीत अथवा अन्य ठिकाणी अपघात झाल्यास १० लाख रुपये अपघात विमा, कारखान्याच्या निधीतून बिनव्याजी एक लाख २५ हजार रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अडचणीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या याेजनेचा फायदा हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...