आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:मी शिवसेनेसोबतच कृषी मंत्री भुसे यांचा खुलासा

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, शिवसेना नेते तथा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे मुंबईतच असून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या दोन बैठकांत सहभागी झाले आहेत, त्यामुळे भुसे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना तूर्त पूर्णविराम मिळाला असून पक्षाबरोबर असल्याचे संकेत मिळाले आहेत.शिंदे व भुसे यांच्यात स्व.सेना नेते आनंद दिघे यांच्या माध्यमातून मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले आहेत.त्यामुळे शिंदेच्या बंडानंतर भुसे यांच्या भूमिकेकडे शिवसैनिक व विरोधकांचेही लक्ष लागून होते. यातच त्यांचा एक मोबाइल नंबर संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याने त्यांच्या विषयी अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र दिव्य मराठीने भुसे यांच्याशी संपर्क केला असता ते वर्षा बंगल्यावर असल्याचे सांगण्यात आले आहे.