आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाच्या प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग बहार मधील पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी विमा पध्दत लागू केली आहे. नाशिक विभागातील द्राक्ष, पेरू, लिंबू, चिकू, मोसंबी या पीकांची निवड झालेली आहे. या पीकांच्या विम्याची मुदत ही द्राक्ष, पेरू व लिंबुसाठी 14 जूनपर्यंत, चिकू व मोसंबीसाठी 30 जून तर डाळिंबासाठी 14 जुलै 2022 पर्यंत विमा हप्ता भरण्याची मुदत दिली आहे.
राज्यात 2011-12 पासून हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू केली होती. त्यानंतर ही योजना सन 2016 ते 17 च्या मृग बहारापासून योजनेची पुनर्रचना करण्यात आली. ही योजना पुढे चालु ठेवण्याकरिता शासनाने 18 जुन 2021 ला पुन्हा मान्यता दिली. नशिक विभागासाठी डाळींब, द्राक्ष, पेरु, चिकू, लिंबू व मोसंबी या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते, अशा नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्याचे आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी विमा संरक्षण दिले जाते. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमायोजनेमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी सहभाग ऐच्छिक रहाणार आहे. तसेच सर्वसाधारणपणे ज्या महसुल मंडळात संबंधित फळपिका खालील क्षेत्र हे 20 हेक्टर पेक्षा जास्त आहे अशा मंडळांमध्ये ही योजना राबविली जाते. या योजनेत केवळ उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण लागू रहाणार असून कमी पाऊस जास्त पाऊस, पासातील खंड, सापेक्ष आद्रता किमान तापमान व गारपीट आदी हवामान धोक्यांपासून संरक्षण दिले जाणार आहे. यामध्ये लाभार्थी शेतकरी हा जास्तीत जास्त चार हेक्टर मर्यादित विमा संरक्षण घेवू शकत असल्याचे विभागीय सांख्यिक अधिकारी भीवसन वरघडे यांनी सांगितले.
फळपिकांकरीता विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत
१) द्राक्ष, पेरु, लिंबू 14 जून 2022
२) चिकू व मोसंबी 30 जुन 2022
३) डाळींब 14 जुलै 2022
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.