आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांकडून एड‌्स‌ जनजागृती

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाएसोच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी नाटिकेचे सदरीकरण केले.कार्यक्रमाचे नियोजन इ ९वी अ च्या वर्गाने केले. वर्गशिक्षिका अबोली अकोलकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये या आजाराबाबत जागृती व्हावी या उद्देशाने एक नाटिका विद्यार्थिनी शिवानी नजान, गौरी जगताप, लीना भिरूड, राशी भोये, मानसी पवार, प्रांजल पाटील, सृष्टी सोनवणे, जान्हवी पाटील, जान्हवी पगारे, दिव्या खैरनार, चैताली सोनवणे, सिद्धी सुरसे, चंचल चव्हाण, आदिती देवरे आदींनी सादर केली.

मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ तसेच अबोली अकोलकर यांनी एड्सबाधित व्यक्तींशी आपुलकीने वागावे, असे सांगितले. संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे तथा मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपमुख्याध्यापिका राजश्री चंद्रात्रे, पर्यवेक्षक साहेबराव राठोड, रवींद्र हात्ते, सहकार्यवाह विजय मापारी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...