आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:मखमलाबाद विद्यालयात एड‌्स जागृती गीत

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मखमलाबाद येथे जागतिक एड‌्स निर्मूलन दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य लालजी आवारे यांनी विद्यार्थ्यांना एड‌्स दिनाबद्दल मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ शिक्षक शिवनाथ हुजरे व संतोष उशीर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी एड‌्स या रोगाची उत्पत्ती, प्रादुर्भाव होण्याची कारणे सांगितली. संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीतमंचातर्फे “क्षणभर मजा...भोगायची सजा..., एड‌्स रोगानं, लावलंय रडायला’ हे एड‌्स गीत सादर केले. कार्यक्रमास उपपप्राचार्य अण्णासाहेब ठाकरे, पर्यवेक्षिका माधुरी थेटे तसेच शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शरीरातील रोग प्रतिकारक शक्तींचा निरंतर ऱ्हास या राेगामुळे हाेत असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...