आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडप:त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी वातानुकूलित मंडप; भाविकांसाठी पिण्याचे पाणी अन‌् स्वच्छतागृहही

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्याेतिर्लिंग त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे दर्शन यंदा सुखकर हाेत आहे. कारण आता देवस्थानने यासाठी अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण दर्शन मंडप उभारला आहे. वातानुकूलित असलेल्या या मंडपात पाच हजार भाविक एकाचवेळी उभे राहू शकतील. पिण्याचे पाणी, बसण्याची सुविधाही उपलब्ध असेल. पहिल्या श्रावणी सोमवारी लाखावर भाविक त्र्यंबकला हाेते. या गर्दीने रांगेतील भाविकांना ६ तासांचा वेळ दर्शनासाठी लागत हाेता. पेड दर्शनही काही वेळा बंद करावे लागले हाेते.

..अशी आहे दर्शनबारी
२५०० भाविक क्षमतेचे दाेन कम्पार्टमेंट {२० ठिकाणी दर्शनासाठी टीव्ही {८ ठिकाणी बाहेर पडण्याचे मार्ग.
श्रावणात दर्शनाची वेळ अशी : सोमवारी पहाटे ४ ते रात्री ९ इतर दिवशी पहाटे ५ ते रात्री ९

बातम्या आणखी आहेत...