आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) दि. ८ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय स्तरावरील सैनिकी शाळांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एआयएसएसइइ ही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेद्वारे देशातील ३३ सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. इंग्रजी माध्यमाच्या या शाळा निवासी पद्धतीच्या असून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्नित आहेत. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे.
देशामध्ये ३३ सैनिकी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच संरक्षण मंत्रालयातर्फे देशभरात १८ नवीन सैनिकी शाळांना मान्यता देण्यात आली असून या शाळा एनजीओ, खासगी संस्था तसेच राज्य सरकार यांच्यामार्फत चालविल्या जाणार आहे. सैनिकी शाळांद्वारे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), नेव्हल अकॅडमी तसेच इतर लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारे शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते.
१८० शहरांत होणार परीक्षा
एनटीएतर्फे घेतली जाणारी एआयएसएसइइ ही परीक्षा देशभरातील १८० शहरांमध्ये रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी घेतली जाणार आहे. https:/ aissee. nta.ni .ac.in या संकेतस्थ ळाद्वारे विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करता येईल. इयत्ता सहावी आणि नववीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. प्रवेशासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून सहावीच्या प्रवेशासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत १०ते १२ वर्षे तर नववीच्या प्रवेशासाठी १३ ते १५ वर्षे वय असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सातारा सैनिकी शाळेत प्रवेशाची संधी उपलब्ध आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.