आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गेल्या तीन-चार महिन्यांपासून विधानसभेची मोर्चेबांधणी करत आहेत. आता त्यांनी लोकसभेकडेही नजर वळवली आहे. मात्र, असे करताना ते पक्षातील दिग्गजांना धक्का देण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसते. कारण सिन्नर येथील जाहीर कार्यक्रमात त्यांनी ‘मी आमदार कोकाटे यांना खासदार करण्याचा विचार करतोय’ असे स्पष्ट केले. यामुळे गेल्या १० वर्षांपासून नाशिकमधून लढणाऱ्या माजी पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर या काका-पुतण्याला पर्याय शोधावा लागेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे काही प्रमाणात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हातात असतील. त्या दृष्टीने त्यांनी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेल्या आणि जेथे २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली त्या मतदारसंघावर त्यांनी भर दिला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.