आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष व महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कांग्रेस (इंटक) चे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कांग्रेस (इंटक) च्या अध्यक्षपदी ऍड. आकाश जयप्रकाश छाजेड यांची सर्वानुमाते निवड करण्याचा ठराव संघटनेचे सरचिटणीस डी.ए.लिपणे पाटिल यांनी मांडला.
महाराष्ट्र एस. टी.वर्कर्स (इंटक) संघटनेच्या नवीन राज्य कार्यकारणीचे सदस्य तसेच विविध निमंत्रित मान्यवर राज्यस्तरीय पदाधिकारी, विभागीय सचिव, महिला संघटक यांची महत्वाची बैठक महाराष्ट्र इंटक कार्यालय,फोर्ट, मुंबई येथे घेण्यात आली.
महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे कार्याध्यक्ष रमेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रथम महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष व महाराष्ट्र व महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कांग्रेस (इंटक) चे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांना आदरांजली वाहण्यात आली. तदनंतर अध्यक्षांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये व व त्याला संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश शिंदे यांनी त्यास अनुमोदन दिले व सर्वानुमाते तो मंजुर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अॅड.आकाश जयप्रकाश छाजेड यांची अध्यक्षपदी निवड करण्यास संमती दर्शविली व हातऊंचावून सदर ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. तदनंतर संघटनेच्या कामकाजाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्वांनुमते अॅड. आकाश जयप्रकाश छाजेड नवनियुक्त अध्यक्ष यांना सहकार्य करण्याचे आश्वासने दिली.
याप्रसंगी रमेश शिंदे कार्याध्यक्ष , डि.ए.लिपणे पाटिल सरचिटणीस, राजाराम पवार,श्री. रामदास गवळी,मयूर फिरके,रविंद्र तवर,विजय गायकवाड़,इकबाल अहमद,रेहान शेख,श्रीकांत गोणारकर,पराग राऊत,बाळासाहेब कासार,अल्तमश शेख,सौ.संगीता फुके,एन.डी.पवार,सूर्यकांत कांदे, नारायण ठाकुर,अनिल हांडोरे, श्रीकांत येडे, के.बी.गवळी, एस.ल. मुळे, विजय जाधव, पोपट बच्छाव, अशोक जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कांग्रेस (इंटक) संघटनेच्या .अॅड.आकाश जयप्रकाश छाजेड नवनियुक्त अध्यक्ष यांनीही वडिलांची कमी भासु देणार नाही याची ग्वाही देऊन कामगारांच्या प्रश्नाबाबत पुन्हा नव्या ताकतीने लढ़ा पुढे चालु ठेवेन असे आश्वासन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.