आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीक्षेत्र काळाराम मंदिरात 6 ऑक्टोबरपासून अखंड हरिनाम सप्ताह:तुकाराम महाराज गाथा चिंतन; ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकच्या पंचवटीतील श्रीक्षेत्र काळाराम मंदीरामध्ये गुरूवारी (ता. 6) पासून ते गुरूवार (ता. 13) ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी ‘अखंड हरिनाम सप्ताह’ चे आयोजन करण्यात आले, अशी माहिती हरिनाम सप्ताह संयोजक प्रमुख ह.भ.प. दामोदर महाराज गावले यांनी दिली.

आयोजित या अखंड हरिनाम सप्ताहात होणाऱ्या विविध धार्मिकमय कार्यक्रमांचा तसेच प्रामुख्याने बुलढाणा-पळसखेड येथील गुरुदेव आश्रमाचे प्रमुख प.पू.स्वामी हरिचैतन्यनंद सरस्वतीजी महाराज यांच्या श्री तुकाराम महाराज गाथा चिंतन बरोबरच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण कार्यक्रमांचा सर्व स्तरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे गुरूवार (ता. 6) रोजी सकाळी आठ वाजता संत व मान्यवर- विश्वस्तांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ पुजन,द्विप प्रज्वलन,कलश-वीणा व ध्वज पूजनाने करण्यात येणार आहे.

दरम्यान,श्रीक्षेत्र काळाराम मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज पहाटे पाचपासून ते सांयकाळी सात वाजेपर्यंत काकडा भजन,पारायण,हरिपाठ,नित्याची आरती होणार आहे. यावेळी दररोज सकाळी 7:30 ते 8:30 यावेळेत एक महाराज अनुक्रमे हभप जयंत महाराज गोसावी (त्रंबकेश्वर),रघुनाथ महाराज खेडलेकर (संत तुकाराम बाबा खेडलेकर संस्थान),नवनाथ महाराज थेटे (गिरणारे),रामनाथ महाराज शिलापूरकर,साहेबराव महाराज रहाणे (मौजे सुकेणे),पुरूषोत्तम महाराज घुमरे (जानोरीकर),आनंदा महाराज महाले (गणेशगांव) यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.

सांयकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत अनुक्रमे ह.भ.प. महादेव महाराज राऊत (बीड),संजय महाराज वेळूकर (सातारा),हभप.दामोदर महाराज गावले(सेवानिवृत्त दुरदर्शन अभियंता नाशिक),रमेश महाराज आडविहीरकर (मुकुंद महाराज संस्थान आडविहीरकर),श्रीविठ्ठल द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर,भागवताचार्य जगदीश महाराज जोशी(त्रंबकेश्वर),ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर(चाळीसगाव) यांचा हरिकिर्तनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे.

गुरुवार (ता. 13) रोजी सकाळी 9 ते 11 यावेळेत ह.भ.प. माधव महाराज घुले यांचे काल्याचे किर्तन होणार असून यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.अशी माहिती संपर्कप्रमुख हभप प्रकाश उखाडे यांनी दिली.अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी श्रीराम वारकरी मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दामोदर महाराज गावले,कोषाध्यक्ष मधुकर काश्मिरे,नारायणराव काकड,लक्ष्मणराव गुळवे,निळकंठ पाटील,खंडूजी चव्हाणके,पुंडलिकराव थेटे,बाळासाहेब नागरे, किशोर ठाकरे, मोतीराम (आबाजी) मुरकुटे,अरूण पाटील आदी प्रयत्नशील आहेत.

बातम्या आणखी आहेत...