आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापपया नर्सरी येथील दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्या वतीने दत्तजयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम हाेत आहे.
गुरुवार १ डिसेंबरपासून सकाळी ८.३०ते १० सामूहिक गुरुचरित्र वाचन, अखंड नामजप यज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला. सप्ताहात नित्य स्वाहाकार मंडल, अग्निस्थापना भूपाळी आरती, स्वामी चरित्र ग्रंथ वाचन, श्री. दुर्गा सप्तशती पाठ, श्री रुद्र अध्याय आवर्तन वाचन, औदुंबर प्रदक्षिणा, सायंकाळी नैवेद्य आरती नित्य सेवा व विष्णुसहस्रनाम आदी कार्यक्रम होत आहे. दत्त जयंतीला बुधवारी (दि ७)दुपारी साडेबाराच्या दरम्यान दत्तजन्म सोहळा होणार आहे. सांगता गुरुवारी (दि.८) हाेईल. सत्य देवता पूजन, महाआरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.