आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांभिकतेचा वेढा साेडवण्यासाठी जगण्यात 'गांधी-विनाेबा' आणा:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विनय सहस्त्रबुद्धेंचे प्रतिपादन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण जग भांडवलशाह आणि समाजवाद यात फिरत असताना महात्मा गांधी, आचार्य विनाेबा भावे यांनी अंत्याेदयाचा विचार केला. सैद्धांतिक बैठक त्यांच्या विचारातून उपलब्द हाेते. आपल्याला दांभिकतेचा वेढा साेडवायचा असेल तर तुमच्या आमच्या जगण्यात, बाेलण्यात थाेडेतरी गांधी, विनाेबा यायला हवे. चांगलं दिसते मात्र चांगले असले पाहिजे असा संवाद विनय सहस्त्रबुद्धे यांनी साधला.

वर्धा येथे सुरू असलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील मुख्य मंडपात 'गांधी ते विनाेबा- वर्तमानाच्या परिप्रेक्षातून' या विषयावरील परिसंवादात विनय सहस्त्रबुद्धे अध्यक्षस्थानावरुन बाेलत हाेते. वैचारिक अस्मितेचे ढग बाजूला सारुन मला येथे विचार मांडायला बाेलवल ते महत्त्वाचे वाटते. असे विषय चर्चेला घेण्यावरुनही हाेते. मात्र त्यामुळे त्या विषयांची शाश्वतता आणि चिरंतनता कमी हाेत नाही. असेही ते म्हणाले.

मतभेद असतात पण...

विनय सहस्त्रबुद्धे ​​​​​​ पुढे बोलताना म्हणाले, ​अनेक गाेष्टींना काळाच्या संदर्भाची चाैकट येतेच येते. गांधीजी आणि नेहरु यांच्याबाबतीतही बाेलले गेले. मात्र सगळ्याच बाबतीत एकमत हाेइल असे नाही. मतभेद असतात पण त्यामुळे मनभेद निर्माण हाेऊ नये ही आपली संस्कृती आहे. गांधीची आणि विनाेबा भावे यांनी जे विचार मांडले ते कधीही संदर्भशून्य हाेऊ शकत नाही. त्याची पाळेमुळे भारताच्या मुळाशी गेली आहे.

लाेकशाहीची परंपरा

विनय सहस्त्रबुद्धे ​​​​​​ म्हणाले, या मातीचा सुगंध ही विचारसरणी आहे. त्यातील चिरंतनता आपल्याला घेण्यासारखी आहे. त्यांच्या विचारव्युहात एक आध्यात्मिकता आहे. आपल्या लाेकशाहीची परंपरा तिचा पायाही आध्यात्मिक लाेकशाहीत आहे. भारतीय लाेकशाहीची हीच परंपरा आधारशीला आहे. म्हणूनच येथील राजकीय लाेकशाही यशस्वी झाली आहे. ताे तुमच्या आमच्या संचिताचा भाग आहे.

भांडवलदार ही एक वृत्ती

विनय सहस्त्रबुद्धे ​​​​​​ म्हणाले, या परिसंवादात गाेव्याहून रमाकांत खलप म्हणाले की, गांधीजींच्या प्रार्थनेत वैष्णव शब्द आल्याने त्यांची ही प्रार्थना हिंदू धर्मियांपर्यंत मर्यादित आहे असे म्हणणे चूक ठरेल. तर मुंबइचे डाॅ. प्रशांत धर्माधिकारी म्हणाले की, भांडवलदार ही एक व्यक्तींपासून वृत्ती आहे. त्या वृत्तीवर काम करायला हवे. असे गांधीची आणि विनाेबांच्या विचारातून दिसून येते.

पुण्याचे भानू काळे म्हणाले की, सूर्योदय या शब्दातून जागतिक विचाराचा भारतात वापर कसा करता येईल हा विचार त्यांनी मांडला. तर सदाग्रह या शब्दाचे रुपांतर त्यांनी सत्यागह या शब्दात केले.

नांदेडचे श्रीकांत देशमुख म्हणाले की, गांधीची आणि विनाेबांचा माणसांच्या सद्भावनेवर विश्वास हाेता. पण, आता न बाेलणारी परंपरा निर्माण झाली आहे. मी महात्मा नाही, माझ्यातील दाेष सांगा. सहिष्णूता, असहिष्णूता, विचार स्वातंत्र्य यावरही देशमुख यांनी भाष्य केले.

बातम्या आणखी आहेत...